मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात; राहुल गांधीचा गौप्यस्फोट; राजीनामा द्या आणि रस्ता साफ करण्याचा दिला सल्ला

by Team Satara Today | published on : 12 October 2026


दिल्ली : लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयावरील मार्चपूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितलं की मला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मेसेज येतात असा दावा केला आहे.
पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांना या विषयावर ज्ञानेश कुमार यांनी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे का अशी विचारणा केली. त्यावेळी राहुल गांधी यांनी आश्चर्यकारक उत्तर दिलं. त्यांनी होय असं सांगत त्यांचे मेसेज येतात. ते ही प्रेस कॉन्फरन्स पाहत आहेत. तुम्ही त्यांच्या मेसेजला काय उत्तर दिलं असं पत्रकारांनी विचारलं.
राहुल गांधींचा काय होता रिप्लाय?
त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, 'माफीचा साक्षीदार व्हा. तुम्ही गुन्हा केला आहे. तुम्ही मुख्य आरोपी नाही. तुम्ही चूक केली आहे. खूप सोपं आहे. राजीनामा द्या आणि रस्ता साफ करा. काही अडचण नाही. आम्ही तुम्हाला माफ करण्याच्या बाबतीत देखील विचार करू शकतो. कारण ही देशाची सेवा असणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका
पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी विरोधी इंडिया आघाडीचे नेते मुख्य निडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरूद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी आणि संविधान वाचवण्याची लढाई सुरू ठेवणार आहेत. दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्थेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी लोकांना राजधानीत पोहचण्यापासून रोखलं जात आहे. त्यांना बसस, ट्रेनमधून खाली उतरवलं जात आहे. राहुल गांधी यांनी दिल्ली पूर्णपणे एका किल्ल्यात रूपांतरित झाली आहे. हजारो पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान तैनात केले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दहिवडी-शिंगणापूर मार्गावर थदाळे गावानजीक पिकअप - ट्रेलरच्या धडकेत चार युवक जखमी
पुढील बातमी
ज्येष्ठ अभिनेत्री अन् लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचं निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

संबंधित बातम्या