सातारा : मुलास शासकीय नोकरी लावतो, असे सांगून अंगणवाडी सेविका असणार्या महिलेकडून 80 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. पीडित महिला ही अंगणवाडी सेविका आहे.
राजेंद्र दिलीप भिलारे राहणार पोस्ट कुडाळ तालुका जावली, महेंद्र गजानन शेवते राहणार भुईंज तालुका वाई, ऋषिकेश शंकर फाळके राहणार वडूथ तालुका सातारा, तानाजी शंकर देवकर व राजेंद्र देवकर दोघेजण राहणार बनपुरी तालुका सातारा या पाच जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राजेंद्र भिलारे यांनी महिलेस मुलाला नोकरी लावतो, म्हणून तिच्याकडून 80 हजार रुपये घेतले. मात्र मुलाला नोकरीस लावले नाही. संबंधित महिलेने नोकरी बाबत वेळोवेळी विचारणा केली असता त्याने व त्याच्या साथीदारांनी महिलेला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. सदर महिला पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असताना तिची अडवणूक करून पुन्हा ठार मारण्याची धमकी दिली व फिर्यादी महिलाच तरुण मुलांना नोकरीच्या अमिष दाखवून फसवणूक करते अशी खोटी बातमी प्रसार माध्यमांना देऊन तिची बदनामी केली, म्हणून संबंधित महिलेने कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस हवालदार बोडरे एस. के. अधिक तपास करत आहेत.
नोकरीच्या आमिषाने महिलेची 80 हजारांची फसवणूक
by Team Satara Today | published on : 30 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा