डोळे आपल्या शरीरातील सगळयात संवेदनशील अवयवांपैकी एक आहेत. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणं खूप महत्वाचं ठरतं. अनेक डोळ्यांमध्ये काहीतरी गडबड असल्याचे संकेत दिसतात. जर याकडे दुर्लक्ष केलं तर समस्या गंभीर होऊ शकते. बऱ्याच लोकांना डोळ्यांची दृष्टी कमजोर होण्याची समस्या असते. अशात ही समस्या कशामुळे होते हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. तसेच याचे संकेत काय असतात हेही जाणून घेऊ.
कोणत्या कारणांनी कमजोर होते दृष्टी
डोळ्यांची दृष्टी कमजोर होण्याला म्हणजे नजर कमी होण्याला मोतिबिंदू,, ग्लोकामा, डायबिटीक रेटिनोपॅथी, मॅक्युलर डिजनरेशन आणि खराब लाइफस्टाईल या गोष्टी कारणीभूत असू शकतात. मोतिबिंदूमुळे डोळ्यांची लेन्स कमजोर होते, त्यामुळे तुम्हाला धुसर दिसू लागतं. तर ग्लूकोमामुळे डोळ्यांच्या ऑप्टिक नर्वचं नुकसान होतं. ज्यामुळे दृष्टी कमजोर होते. तसेच जास्त स्क्रीन टाइम, पोषणाची कमतरता आणि धुम्रपानामुळेही डोळ्यांची दृष्टी कमजोर होऊ शकते.
दृष्टी कमजोर झाल्याची लक्षण
जर एखाद्या व्यक्तीला सतत धुसर दिसत असेल तर मग ते जवळचं असो वा दूरचं हा दृष्टिदोषाचा संकेत असू शकतो. अशात लगेच डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवा. वेळीच चष्म्या लावल्यानं आणि इतर उपचार घेतल्यानं दृष्टी चांगली करता येऊ शकते. जर अचानक दृष्टी कमजोर होत असेल किंवा काही वेळेसाठी अंधारी येत असेल जराही उशीर न करता डॉक्टरांना भेटा.
डोळयांमध्ये सतत जळजळ होत असेल, डोळे खाजवत असतील किंवा लाल होत असतील तर डोळ्यांची अधिक काळजी घ्यावी याचा हा संकेत आहे. हे अॅलर्जी, संक्रमण किंवा ड्राय आई सिंड्रोमची लक्षणं असू शकतात. जर डोळ्यांमधून सतत पाणी येत असेल तर हा सुद्धा काहीतरी समस्या असण्याचा संकेत असू शकतो. बरेच लोक डोकेदुखीला सामान्य समजून याकडे दुर्लक्ष करतात. पण जर डोकेदुखीसोबतच डोळ्यांमध्ये जडपणा वाटत असेल किंवा वेदना होत असेल तर समजा डोळ्यांसंबंधी काहीतरी समस्या आहे.
काय कराल उपाय?
लहान मुलं जर अभ्यास करताना डोळे उघड-बंद करत असतील, डोळे चोळत असतील किंवा टीव्ही फार जवळून बघत असतील तर त्यांचे डोळे तपासण्याची गरज आहे. त्याशिवाय डायबिटीस किंवा हाय ब्लड प्रेशर रूग्णांना नियमितपणे डोळ्यांची तपासणी करणं महत्वाचं असतं. कारण या आजारांचा थेट प्रभाव डोळ्यांच्या नसांवर पडू शकतो. वृद्ध व्यक्तींनी सुद्धा नियमितपणे डोळ्यांची तपासणी केली पाहिजे.
तसेच लाइफस्टाईल हेल्दी ठेवा. डोळ्यांची दृष्टी मजबूत ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घ्या, डोळ्यांचे व्यायाम करा आणि टीव्ही-मोबाइलचा वापर कमी करा.