सातारा : चंदननगर, कोडोली येथे अज्ञात चोरट्यांनी 40 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चंदननगर, कोडोली ता.सातारा येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी घरातून सुमारे 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना दि. 22 ऑगस्ट रोजी भरदिवसा घडली आहे. याप्रकरणी शशांक शिवाजी पालेकर (वय 22, रा. चंदनगगर, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पोतेकर करीत आहेत.