12:49pm | Sep 12, 2024 |
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल मेहता यांचा काल मृत्यू झाला. इमारतीच्या सातव्या मजल्यावरून त्यांनी उडी मारून जीव दिल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, पोलिसांनी सुरुवातीपासूनच ही आत्महत्या नसल्याचं सांगितलं होतं. अनिल हे आजारीही नव्हते. त्यामुळे अनिल मेहता यांचा मृत्यू कसा झाला? याबाबतच्या उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. पोस्टमार्टम रिपोर्टमधूनच या सर्व गोष्टी समोर येणार होत्या. त्यामुळे सर्वांचं लक्ष पोस्टमार्टम रिपोर्टकडे लागलं होतं. अनिल मेहता यांचा पोस्टमार्टम अहवाल आला असून त्यातून धक्कादायक माहितीसमोर आली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगळ्या अँगलकडे गेल्याचं सांगितलं जात आहे.
अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांच्या मृतदेहाचे कूपर पोस्टमॉर्टम सेंटरमध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्याचा प्राथमिक अहवाल आला आहे. या प्राथमिक अहवालात मृत्यूचे कारण अनेक जखमा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनिल यांना एवढ्या जखमा कशामुळे झाल्या? जखमा आधीच होत्या की इमारतीवरून पडल्यामुळे या जखमा झाल्या? याबाबतचे गुढ निर्माण झाले आहे.
अनिल यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी आणि मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी त्यांचा व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. काल रात्री 8च्या सुमारास अनिल यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल इमारतीतून ज्या ठिकाणी कोसळले तिथे रक्त मिळालं आहे. अनिल मेहता हे बाल्कनीत बसून पेपर वाचायचे. लिव्हिंग रुममध्ये त्यांची चप्पल होती. जेव्हा आम्ही बाल्कनीतून पाहिलं तेव्हा वॉचमन मदतीसाठी जोरजोरात ओरडत होता, असं मलायकाच्या आईने पोलिसांना सांगितलं.
दरम्यान, मृत्यूपूर्वी अनिल यांनी त्यांची मुलगी मलायका अरोरा हिच्याशी फोनवर संवाद साधला होता. एक दिवस आधीच या दोघांचं फोनवर बोलणं झालं होतं. तसेच ते एक दिवस आधी दुसरी मुलगी अमृता अरोरालाही भेटले होते. मी आजारपणाला कंटाळलोय, असं त्यांनी या दोन्ही मुलींना सांगितल्याचं सांगण्यात येतं. आजारपणामुळेच त्यांनी आत्महत्या केली का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |