सातारा : अवैधरित्या गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विविध प्रकारचा पानमसाला विक्री करण्यावर बंदी असतानाही तो गुरुवार परज येथे सापडल्याने इरफान जमाल खान (वय 42, रा. शनिवार पेठ, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा विभागाने याप्रकरणी कारवाई केली आहे. संशयिताकडून 3403 रुपयाचा पानमसाला जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 23 जुलै रोजी करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल करीत आहेत.