सातारा : महसूल न्यायालयातील सुनावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला अडवून जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपाल यशवंतराव तंतरपाळे यांच्या फिर्यादीवरून स्वप्निल खंडागळे यांच्यासह शिवाजी आश्राम खंडागळे, किरण शिवाजी खंडागळे, तुषार रवींद्र खंडागळे, मंगल शिवाजी खंडागळे, पुष्पा रोहिदास गायकवाड, वर्षा किरण खंडागळे, विद्या स्वप्नील खंडागळे (सर्व राहणार खंडाळा तालुका खंडाळा) आणि एका अज्ञात वकिलाविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील अधिक तपास करत आहेत.