सातारा : वासोळे (पो. वाढे, ता. जि. सातारा) येथे शनिवारी (दि. २५) मध्यरात्री झोपताना उशाजवळ ठेवलेले ६५ हजार रुपये किंमतीच्या दागिन्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली.
फुलाबाई मारुती शिंदे (वय-७९, रा. वासोळे) यांनी याबाबत सातारा तालुका पोलिसांत तक्रार दिली आहे. सदाशिव मारुती नवघणे यांच्या वासोळे येथील रहात्या घरातून हा प्रकार झाला आहे. अज्ञात दोन चोरट्यांनी फुलाबाई शिंदे यांनी उशाला ठेवलेले ६५ हजार रुपये किंमतीचे एक तोळे वजनाचे मंगळसूत्र घराचे दार उघडून घरात प्रवेश करुन चोरुन नेले आहे. पो. ना. वायदंडे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.