10:31pm | Sep 08, 2024 |
फलटण : फलटण शहरात अनियंत्रितपणे ध्वनिक्षेपक लावणार्या दहा डीजे मालकांवर फलटण शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल फलटण शहरात श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अनेक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेश मूर्तीच्या आगमनाच्या मिरवणुका काढल्या होत्या. परंतु मिरवणुकीच्या माध्यमातून काही डीजे मालकांनी आवाजाच्या मर्यादा ओलांडल्यामुळे फलटण शहरात गणरायाच्या आगमन उत्साहात डिजे वाल्यांच्या आवाजाच्या स्पर्धेमुळे नागरिक हैराण झाले होते. याबाबत नागरीकांमधून सोशल मीडियातुन तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
त्यानंतर फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, पोहवा चंद्रकांत धापते, सचिन जगताप, बापूराव धायगुडे, पोलीस शिपाई मुकेश घोरपडे, महेश जगदाळे, सचिन पाटोळे, काकासो करणे, जितेंद्र टिके वगैरे यांनी डीजे मालकांवर कारवाईचा बडगा उगारत दबंग कारवाई केली.
कलम 36(इ-अ)/134 नुसार डीजे मालक शामराव अहिवळे स्वारगेट पुणे, अथर्व चौगुले कात्रज पुणे, शोएब आतार शुक्रवार पेठ फलटण, तुकाराम शिंदे झिरपवाडी फलटण, अभिषेक जगदाळे दहिवडी, ऋतुराज सरगर धनगरवाडी सातारा, प्रदीप जगताप विद्यानगर फलटण, श्यामकुमार काकडे स्वामी विवेकानंद नगर फलटण, राजेंद्र जाधव सुंदरनगर लोणंद, योगेश पोंदे सगुनामाता नगर फलटण, यांच्यासह अनेक मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर कारवाई केली. या कारवाईबद्दल फलटण शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचार्यांचे नागरिकांमधून अभिनंदन होत आहे.
आगामी कालावधीत फलटण शहर पोलीस ठाण्याकडून अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी शहर पोलीस स्टेशन कडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस ठाण्याकडून सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांना गणेशोत्सवाचा आनंद सर्व जनतेस आनंदात व उत्साहात घेता यावा, जनतेस त्रास होणार नाही आणि परवानगी मध्ये दिलेल्या क्षमतेच्या मर्यादे पर्यंतच डीजे साउंडचा आवाज नियंत्रित ठेवावा. गणेश उत्सवानिमित्ताने विधायक किंवा लोकोपयोगी आणि आदर्श घेण्याजोगे तसेच मंडळाचे नावलौकिक वाढवणारे उपक्रम राबवावेत, असेही आवाहन यावेळी फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मंडळांना करण्यात आले आहे.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |