अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आराधना गुरव निमंत्रितांच्या कविसंमेलनाकरता निमंत्रित

by Team Satara Today | published on : 12 December 2025


पुसेगाव : सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जि. प. प्राथमिक शाळा रहाटणी, ता. खटाव येथील उपक्रमशील शिक्षिका सौ आराधना संतोष गुरव यांना निमंत्रितांच्या कविसंमेलनात निमंत्रीत करण्यात आले आहे. 

सौ. आराधना गुरव यांनी ज्ञानसाधनेबरोबर कथा, काव्य, ललित, बालनाटिका, विविध वृत्तपत्रातून प्रासंगिक लेख लिहीले आहेत. मृदगंध, वर्तुळ व कधी कधी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले असून सातारा आकाशवाणी व म्हसवड तरंग वाहिनीवरून सौ. गुरव यांचे विविध विषयावरील साहित्य प्रसारित करण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पुसेगावच्या त्या सक्रिय सदस्या आहेत. या निवडीबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सौ. सुनिताराजे पवार, प्रा. अविनाश फडतरे, संजयराव जाधव, नितीन जाधव, झांजरकार प्रा. दिनेशराव फडतरे, सोनाली विभुते, विस्तार अधिकारी अरुण पाटील, केंद्रप्रमुख मुलाणी, मुख्याध्यापक उत्तम माने तसेच शाळा समिती अध्यक्ष श्री देवीदास थोरात व पदाधिकारी  तसेच अन्य मान्यवरांनी अभिनंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मंत्री जयकुमार गोरे व आ. शशिकांत शिंदे यांच्यात अधिवेशनात जुगलबंदी; ‌‘तळतळाट‌’ शब्दावरून जुंपली; एकमेकांना चिमटा
पुढील बातमी
इंडियन एअरफोर्समध्ये स्पर्धा परीक्षामधून निवडझाल्याबद्दल शंभूराज राजेघाटगे याचा सत्कार

संबंधित बातम्या