सातारा : सातारा शहर पोलिसांनी सातारा शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे मारून दोन जणांविरोधात कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सातारा एसटी स्टँड परिसरात दीपक दिनेश जोशी राहणार मंगळवार पेठ सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून 520 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
दुसऱ्या कारवाईत, प्रतापसिंह नगर येथील भोसले किराणा स्टोअर्स च्या आडोशाला प्रवीण राजेंद्र साळवे रा. प्रतापसिंह नगर, सातारा याच्याकडून 560 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.