सातारा : अवैधरित्या दारुची वाहतूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यात कारमधून 16800 रुपये किंमतीचा दारुचा साठा पोलिसांनी जप्त केला. दारुच्या 290 बाटल्या पोलिसांना सापडल्या आहेत. याप्रकरणी अक्षय सुरेश शिवगण (वय 32, रा.रविवार पेठ, सातारा) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.