सातारा : शाहूनगर मध्ये अज्ञात चोरट्यांनी चैन स्नॅचिंग केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अश्विनी प्रशांत फडतरे रा. शाहूनगर, सातारा या अजिंक्य बाजार चौकाच्या अलीकडील डंपिंग ग्राउंड जवळून चालत जात असताना अनोळखी मोटरसायकल वरील अंदाजे 30 ते 35 वर्षाच्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावले. मात्र फडतरे यांनी त्यास अटकाव केला. तरी तुटलेले जवळपास सहा ते सात ग्रॅम वजनाचे मिनी गंठण त्यांनी चोरून नेले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार माने करीत आहेत.