04:37pm | Aug 23, 2024 |
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनमध्ये दाखल झाले आहेत. काही तासांसाठी त्यांचा हा युक्रेन दौरा आहे. फार कमी जणांना माहित असेल, युक्रेन भारताचा डिफेन्स पार्टनर आहे. त्यामुळे मोदींचा युक्रेन दौरा महत्त्वाचा आहे. सध्या रशिया-युक्रेनमध्ये मागच्या अडीच वर्षांपासून युद्ध सुरु आहे. मागच्या 30 वर्षात युक्रेन दौऱ्यावर जाणारे मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. भारत आणि युक्रेनमध्ये डिफेन्स टेक्नोलॉजी आणि शस्त्रास्त्रांचा आदान-प्रदान होत असतं. भारत युक्रेनमध्ये बनणाऱ्या R-27 मिसाइलचा वापर करतो. हवेतून हवेत वार करण्यासाठी R-27 मिसाइलचा वापर होतो. इंडियन एअर फोर्स SU-30MKI फायटर जेटमध्ये या मिसाइलचा वापर करत आहे. युक्रेन स्वतंत्र झाल्यापासून सैन्याशी संबंधित टेक्नोलॉजी आणि उपकरणाच्या माध्यमातून भारताशी संरक्षण सहकार्य सुरु आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात R-27 मिसाइलची निर्मिती होते. भारत दोन्ही देशांकडून हे मिसाइल आयात करतो.
युक्रेन आणि भारतामध्ये आधीच 70 मिलियन अमेरिकी डॉलरचे चार वेगवेगळे संरक्षण करार झाले आहेत. यात युक्रेनकडून होणाऱ्या R-27 मिसाइलचा पुरवठा सुद्धा आहे. युक्रेन फक्त शस्त्रच देत नाहीय, तर त्या अस्त्राची देखभाल आणि विकासात सुद्धा मदत करतोय. भारताला AN-178 विमान देण्याचेही संकेत युक्रेनने दिले आहेत.
R-27 हवेतून हवेत मारा करणारी गायडेड मिसाइल आहे. या मिसाइलच डिझाइन एप्रिल 1962 मध्ये बनवण्यात आलं होतं. 1986 मध्ये उत्पादन सुरु झालं. आज रशियाची फर्म विम्पेल आणि यूक्रेनची फर्म आर्टेम या क्षेपणास्त्राची निर्मिती करतात. जगभरातील 25 पेक्षा अधिक देशांना वेगवेगळ्या वर्जनचा पुरवठा सुरु आहे. सर्व प्रकारच्या फायटर विमानात या क्षेपणास्त्राचा वापर होतो. रोटरक्राफ्ट, क्रूज मिसाइल आणि मानव रहीत विमानांवर हल्ला करण्यासाठी हे क्षेपणास्त्र बनवण्यात आलं आहे.
1991 साली सोवियत संघाच विघटन झालं. त्यानंतर युक्रेन स्वतंत्र देश बनला. तेव्हापासून एकही भारतीय पंतप्रधान तिथे गेलेला नाही. एकवेळ युक्रेन सोवियत संघाचा भाग होता. त्यामुळे युक्रेनकडे सुद्धा रशियाप्रमाणे महत्त्वाची संरक्षण टेक्नोलॉजी आहे. भले, कुठला भारतीय पंतप्रधान युक्रेन दौऱ्यावर गेला नसेल, पण भारतासोबत चांगले संरक्षण सहकार्य करार आहे. पंतप्रधान मोदी दोन दिवस पोलंडमध्ये होते. आज ते युक्रेनची राजधानी कीव येथे ट्रेनने पोहोचले. कारण युद्धग्रस्त देशात हवाई प्रवास शक्य नाही.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |