सातारा : विनयभंगासह महिलेस मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी दुर्गादेवी मिरवणुकी दरम्यान साडेदहा वाजण्याच्या सुमारास गुरुवार पेठ, सातारा येथे दोन महिलांच्या विनयभंगासह त्यांना मारहाण केल्याप्रकरणी उदय वंजारी, सागर वंजारी दोघे रा. भोई गल्ली गुरुवार पेठ सातारा, साक्षी, प्रेमा, राधा (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.