आंबेडकर युथ फोरमचे साताऱ्यात पोलखोल आंदोलन; सोनगाव डेपो प्रकरणातील अधिकारी ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

by Team Satara Today | published on : 24 March 2026


सातारा  : सातारा नगरपालिकेतील सोनगाव कचरा डेपो चा टेंडर प्रकरणात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे या प्रकरणातील भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी आंबेडकर युथ फॉर्म महाराष्ट्र यांच्या वतीने पोलखोल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये फोरमचे अध्यक्ष प्रा. गणेश वाघमारे, संतोष आवळे, अजय पुलावडे, तुषार बोकेफोडे, दीपा काळे, महेश अडागळे इत्यादी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद आहे की, संबंधित ठेकेदार संस्था यांच्या बँक खात्याची तसेच जमाखर्चाचे तत्काळ लेखापरीक्षण करून कोणाच्या खात्यावर किती पैसे जमा झाले याची चौकशी व्हावी.

ठेकेदाराचे हित जोपासणारा लेखापाल आरोग्य निरीक्षक मुख्याधिकारी यांची चौकशी होऊन त्यांच्याकडून तात्काळ पैसे वसूल करण्यात यावे, टेंडर निवड प्रक्रिया झाल्यापासून ते आजपर्यंत झालेल्या सर्व कामाचे लेखापरीक्षण निवृत्त न्यायमूर्ती यांच्या समितीमार्फत करून सर्वदोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई व्हावी , सोनगाव कचरा डेपोला लागलेल्या आगीची उच्चस्तरीय चौकशी करून कामात निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदार संस्था आणि अधिकारी यांच्या जबाबदारी निश्चित करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा परिषदेच्या शाळांचा झेंडा ; नवोदय परीक्षेत साताऱ्याची राज्यात दमदार कामगिरी
पुढील बातमी
शाहूनगर जगतापवाडीत घरफोडी; सुमारे ८.९४ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; परिसरात भीतीचे वातावरण

संबंधित बातम्या