सातारा : मारहाण प्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील कनिष्क हॉल जवळ, शिवराज नरेंद्र मस्के रा. गुरुवार पेठ, सातारा यांना लाकडी दांडक्याने तसेच फायटरने मारहाण केल्याप्रकरणी सौरभ सोनवले, अतुल तुपे, निखिल सोनवले, आशिष सोनवले, प्रीतम सोनवले सर्व रा. सातारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक जुनघरे करीत आहेत.