गुरुवार पेठ परिसरात घर दुरुस्तीच्या वादातून मारहाण; जातिवाचक अपमान केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 06 June 2026


सातारा : घर दुरुस्तीच्या कामावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने अनुसूचित समाजातील व्यक्तीस मारहाण व जातिवाचक अपमान केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमलेश निकोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवार पेठ परिसरात नातेवाईकांच्या घरातील दुरुस्तीच्या कामासाठी गेले असताना त्यांच्यासोबत वाद झाला. या वादादरम्यान त्यांना खाली ओढून मारहाण करण्यात आली. तसेच समाजाचा उल्लेख करून अपमानास्पद शब्द वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

तक्रारीनुसार, एका आरोपीने दांडक्याने तर दुसऱ्याने वीट फेकून हल्ला केला. या घटनेत जखमी झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी विजय सराफ आणि पुनित सराफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले पुढील तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलेचे आक्षेपार्ह व अश्लिल फोटो, व्हिडीओ प्रसारित करणा-या दोघांना अटक; फलटण शहर पोलिसांची कारवाई
पुढील बातमी
गुरुवार पेठ परिसरात जागेच्या वादातून हॉटेल व्यावसायिकाला मारहाण; रोकड हिसकावल्याचा आरोप

संबंधित बातम्या