खोट्या गुन्ह्याच्या धमकीने रोख रकमेसह दागिण्याची चोरी

सातारा : खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत रोख रक्कमेसह दागिण्याची चोरी केल्याप्रकरणी चारजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 फेब्रुवारी रोजी शादमानी उर्फ खुशबू शाहिद आतार शाहिद बाळासो आतार नसीम शाहिद आतार जमीर शाहिद आतार सर्व रा. प्रथमेश कॉलनी, विद्यानगर, कराड या चौघांनी घरात घुसून 25 लाख रुपये दे नाहीतर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत रोख रक्कम व सोन्याचा ऐवज लांबवल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ही घटना दि. 17 फेब्रुवारी रोजी घडली असून घरामध्ये दारावरील पाटीवर संशयितांनी नाव लिहले असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.



मागील बातमी
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
राहत्या घरातून एकजण बेपत्ता

संबंधित बातम्या