एसटी स्टॅन्ड परिसरातून मंगळसूत्राची चोरी

by Team Satara Today | published on : 31 October 2024


सातारा : सातारा एसटी स्टॅन्ड परिसरातून अज्ञात चोरट्याने मंगळसूत्राची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा एसटी स्टॅन्डमध्ये गर्दीचा गैरफायदा घेवून चोरट्याने पर्समधून 35 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरुन नेले. ही घटना दि. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी सायरा समीर मुलाणी (वय 30, रा. नेलेकरंजी ता.आटपाडी जि.सांगली) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सहकार्य करा : बाळासाहेब पाटील
पुढील बातमी
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई

संबंधित बातम्या