सर्व विभागांनी एकत्रित जिल्हा परिषद म्हणून कामकाज करावे - डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे चार वर्षांचे वार्षिक तपासणीचे अहवाल वाचन

by Team Satara Today | published on : 23 December 2025


सातारा :  जिल्हा परिषदेचे सन 2020-21,2021-22,2022-23  व 2023-24  या चार वर्षाचे वार्षिक तपासणीचे अहवाल वाचन सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार  पडले. सदर अहवाल वाचनाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी केले. तदनंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने स्वागत करुन अहवाल वाचनास सुरुवात झाली, यावेळी मा.डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सर्व विभागांचा प्रत्येक खातेप्रमुखामार्फत आढावा घेतला.  

यावेळी त्यांनी सर्व खातेप्रमुखांनी क्षेत्रीय भेटी देऊन जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येत असणाऱ्या  विविध विकास कामे, योजना ,  प्राथमिक शाळा, प्राथमिक आरेाग्य केंद्रे, उपकेंद्र, ग्रामपंचायती व अंगणवाडी यांना भेटी देण्याबाबत सूचना केल्या. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीमधील अपहार प्रकरणे जलद गतीने निकाली काढणेबाबत सूचना केल्या. सातारा जिल्हयातील शाळांतील शिक्षणाची गुणवत्ता वाढण्याच्या अनुषंगाने सर्वानी कामकाज करणेबाबत देखील सूचना केल्या. सातारा जिल्हयातील अंगणवाडयातील कमी वजनाच्या बालकांवर विशेष लक्ष देऊन त्यांचे श्रेणीवर्धन करण्याबाबत विशेष मोहिम राबविण्यात यावी याबाबतच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या अनुषंगाने देखील मोहिम हाती घेऊन त्याबाबत दंडात्मक कारवाईच्या सूचना देखील यावेळी करण्यात आल्या. महालेखापाल,स्थानिक निधी लेखा शकांच्याबाबत विशेष शिबीरांचे आयोजन करुन शक पूर्तता करुन जास्तीत लेखाआक्षेप वगळण्याबाबतच्या सूचना देखील यावेळी करण्यात आल्या याशिवाय मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानामध्ये सातारा जिल्हयातील जास्तीत जास्त गावामंध्ये चांगले काम करणेबाबत देखील सूचना यावेळी विभागीय आयुक्त यांनी केल्या .

सदर अहवाल वाचनानंतर  सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात येत असणाऱ्या नावीनन्यपूर्ण योजनांचे व कामकाजाचे सादरीकरण केले. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. 

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील,  अपर आयुक्त नितीन माने,  रवींद्र  कणसे, सहाय्यक आयुक्त विजय धनवटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, प्रकल्प संचालक विश्वास सिद, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, उपमुख्य  कार्यकारी अधिकारी राहुल देसाई , उपमुख्य कार्यकारी अधिकारी नागेश ठोंबरे,  कार्यकारी अभियंता मोहसिन मोदी, कार्यकारी अभियंता अमर नलावडे, गौरव चक्के,  शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी,धनंजय चोपडे, प्रभारी जिल्हा आरोग्य  अधिकारी सुनिल चव्हाण,  जिल्हा समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार, उपायुक्त पशूसंवर्धन दिनकर बोर्डे,  पशूसंवर्धन अधिकारी विनोद पवार, कृषि विकास अधिकारी गजानन ननावरे,  व सर्व तालुक्याचे गट विकास अधिकारी व सातारा जिल्हा  परिषदेच्या सर्व विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी  व कनिष्ठ प्रशासन अधिकारी  उपस्थित होते. त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त कार्यालयातील श्री.चंद्रकांत कुलकर्णी, श्री.गणेश कस्तुरे, श्री.विष्णू कशाळे हे ही उपस्थित होते. अहवाल वाचनानंतर राहुल देसाई यांनी आभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्याच्या विकासाचा अजेंडा राबवा - खा उदयनराजे यांच्या सूचना; विजयी झालेल्या नगरसेवकांनी घेतली भेट, निशांत पाटील उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक
पुढील बातमी
मागसवर्गीयांच्या शौचालयप्रश्नी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करु; झेडपी सीईओंच्या आश्वासनानंतर रमेश उबाळे यांचे आंदोलन स्थगित

संबंधित बातम्या