आंदोलनामुळे अडकलेल्या परराज्यातील ट्रकचालकांना देशमुख व कांबळे यांचा मायेचा आधार! नागठाणे येथे ट्रकचालकांना अन्नदानासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

by Team Satara Today | published on : 06 November 2026


सातारा : शेतकरी संघटनेच्या उसाला योग्य दर मिळावा या मागणीसाठी सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे नागठाणे परिसरात अनेक परराज्यातील ट्रकचालक अडकून पडले होते. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाल्याने या ट्रकचालकांची जेवणाची तसेच पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असल्याचे लक्षात येताच राघव देशमुख आणि शुभम कांबळे यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.
राघव देशमुख आणि शुभम कांबळे यांनी स्वतः ट्रकचालकांकडे जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना अन्नदान करून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. एवढ्यावरच न थांबता ट्रकचालकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणार्‍या वस्तूंचेही वाटप करण्यात आले. यामध्ये आंघोळीसाठी टॉवेल, साबण, तेल आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.
अचानक मिळालेल्या या मदतीमुळे परराज्यातून आलेल्या ट्रकचालकांना मोठा दिलासा मिळाला. संकटकाळात आपुलकीने विचारपूस करून जेवण आणि आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्याबद्दल ट्रकचालकांनी राघव देशमुख आणि शुभम कांबळे यांचे मनापासून आभार मानले.
‘माणुसकीला कोणत्याही राज्याची सीमा नसते’ याचा प्रत्यय या उपक्रमातून आला. आंदोलनामुळे अडचणीत सापडलेल्या परराज्यातील बांधवांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम या युवकांनी केले.
या सामाजिक उपक्रमात राघव देशमुख मित्र समूह, शुभम कांबळे जगीरा मित्र समूह, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) अध्यक्ष सतीश कांबळे, पैलवान राहुल मदने, किरण मोरे यांचा सहभाग होता.
संकटात सापडलेल्या अनोळखी व्यक्तींनाही आपले समजून मदतीचा हात देणार्‍या या युवकांच्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गोजूबावी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका प्रिया नाळे-बोराटे यांची राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड
पुढील बातमी
सातारा तालुका पोलिसांच्या मायेच्या स्पर्शाने दिव्यांगांची दिवाळी झाली गोड! दिव्यांग बांधवांना मिठाई व भेटवस्तूंचे वाटप

संबंधित बातम्या