सातारा : काशीदवाडी, ता. फलटण येथे शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाणी उपसा करणारी लक्ष्मी कंपनीची मोटार अज्ञाताने चोरी केली आहे .याप्रकरणी जनार्दन राजाराम ढवळे (वय 65 रा. काशीद वाडी) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना दि. 26 जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते रात्री बाराच्या दरम्यान घडली आहे अज्ञात चोरट्याने काशीद यांच्या विहिरीलगतच्या पंप हाऊस मधील लक्ष्मी कंपनीची चाळीस हजार रुपयेभिंतीची तीन एचपी पॉवरची मोटार चोरून नेली. पोलीस हवालदार पवार तपास करत आहेत.