सातारा : मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. यामुळे महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्यावतीने सातारा येथील शिवतीर्थावर बुधवारी दुपारी भर पावसात पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने व आंदोलन करण्यात आले. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दीपक पवार, सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला प्रदेश सदस्य समिंद्रा जाधव, विजय बोबडे, अतुल शिंदे, शिवराज फाळके, प्रताप जगदाळे, इस्माईल मुल्ला, अझर मनेर, नाथाजी बाबर, प्रथमेश पवार, अनिल बडेकर, भानुदास भोसले, सचिन जाधव, सुशांत जाधव, तुषार परीट यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हातात फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली.
शिवरायांचा अपमान आम्ही सहन करणार नाही... खोकेवाल्यांना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही... पुतळा नव्हे स्वाभिमान कोसळला... फक्त समुद्र नव्हे महाराष्ट्र खवळला..., राजे आम्हाला माफ करा पण बेईमान गद्दारांना साफ करा... असे फलक निदर्शकांनी हाती घेतले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात सातारा शहर पोलीस कर्मचारी व काही प्रसारमाध्यमाने रस्त्यावर गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या राजधानीतच घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महापूर उसळला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्याला एक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल |
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |