सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पिता-पुत्राविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी रिहान शेख (पूर्ण नाव माहित नाही), रिहान शेख याचे वडील (दोन्ही रा. गोडोली, सातारा) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार सुडके करीत आहेत.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पिता-पुत्रांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
by Team Satara Today | published on : 28 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा