सातारा, दि. 11 : हातात साप घेऊन हुल्लडबाजी करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थी सातारा शहरातील मुख्य रस्त्यावर फिरत असतानाची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारीत होताच सातारा शहर वाहतूक शाखा आणि निर्भया पथकाने तीन अल्पवयीन मुलांच्या पालकांवर वाहतूक अधिनियमान्वये कारवाई केली आहे. विद्यार्थ्यांना समज देण्यात आली असून त्यांच्याकडून हमीपत्र घेण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित यादव यांनी दिली.
महाविद्यालय सुटल्यावर घरी जात असताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हातात प्लास्टिक सापाची प्रतिकृती हातात घेऊन फिरणाऱ्या विद्यार्थ्यांनी टिबल सीट दुचाकी चालवून महाविद्यालय व रस्त्यावर हुल्लडबाजी आणि दहशत करण्याचा प्रयत्न केला. शहरातील मुख्य रस्त्यावर फिरत असतानाची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारीत झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. याची दखल पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी घेतली व कारवाई करण्याच्या सूचना केल्या. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव व निर्भया पथकाने मुलांचा शोध घेतला. ही मुले लहासुर्णे व निढळ (ता. कोरेगाव) येथील आहेत. महाविद्यालयात दुचाकीवरून दोघेजण जात असताना रस्त्यात थांबून तिसऱ्या मित्राने त्याला महाविद्यालयातून बरोबर घेऊन जाण्यास सांगितले. यावेळी दुचाकीवर या तिसऱ्या बसलेल्या मित्राने त्याच्या बॅग मधील प्लास्टिकचा साप हातात घेऊन हुल्लडबाजी केली. ही बाब चालकाला पोलीसानी बोलावल्यावर माहीत झाली.
पोलिसांनी गाडी मालक दुचाकी चालकाच्या वडिलांवर वाहतूक नियमांवर एक हजार पाचशे रुपये दंड आणि तीन अल्पवयीन मुलांना समज देऊन त्यांच्याकडून हमीपत्र घेतले आहे.
वनविभागाच्या कारवाईकडे लक्ष
सातारा कास रस्त्यावर माकडांना खाऊ घातले तर वनविभागाने कारवाई केली होती. आता हातामध्ये खरा अथवा प्लास्टिकचा साप घेऊन दहशत करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे होते आता वनविभागाच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे. या कारवाई सचिन माने, जास्मिन पटेल, निर्मला भागवत, लक्ष्मण पारेकर यांनी भाग घेतला