माहेरहून पैश्याची, सोन्याची मागणी करत सुनेचा जाचहाट; ५ जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 07 February 2026


सातारा :  सदर बाजार येथे कूपर कॉलनी प्राची प्राईडमध्ये राहणाऱ्या ऋतुजा अक्षय जाधव (वय २८) यांना पती,सासू-सासरे,पतीचे मामा व पतीच्या काकांकडून जाचहाट केल्याची घटना सप्टेंबर २०२३ ते ३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडली आहे.

अक्षय संजय जाधव सासू अनिता संजय जाधव सासरे संजय जाधव मामा राहुल वायकर आणि काका माणिक जाधव यांनी संगमने ऋतुजा यांना पैशाची व सोन्याची मागणी करत तू व तुझ्या घरच्यांनी आम्हाला फसवले आहे. असे म्हणून हाताने मारहाण करत शिवीगाळ आणि दमदाटी केली आहे. तसेच फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने ५ जणांविरोधात जाचहाट केल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पत्नीसह मुलगा, मुलगी झाली बेपत्ता झाल्याची तक्रार
पुढील बातमी
दुकान लावण्याच्या कारणावरून दोन जणांकडून तामजाईनगरच्या एकाला मारहाण

संबंधित बातम्या