ड्रंक ॲण्ड ड्राईव्हप्रकरणी चौघांवर कारवाई

सातारा, शाहुपूरी पोलीस ठाण्यासह वाहतूक विभागाची कारवाई

by Team Satara Today | published on : 31 December 2024


सातारा : थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी सातारा शहर पोलीस ठाणे, शाहुपूरी पोलीस ठाणे, वाहतुक विभाग शखेच्यावतीने सातारा परिसरात मंगळवारी सकाळपासूनच नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह प्रकरणी दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्या तसेच वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या चार जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

याबाबतची अधिक माहिती अशी, थर्टी फस्ट साजरा करण्याच्या नावाखाली अनेकजण मद्यप्राशन करुन वाहने चालवत असतात. मद्यधुंद स्थितीत अनेक ठिकाणी गोंधळ घातला जातो. या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलीस ठाणे, शाहूपुरी पोलीस ठाणे, वाहतूक शाखा अशी संयुक्त कारवाई ३१ डिसेंबर रोजी सकाळपासून रात्री दोन वाजेपर्यंत सातारा शहरातील बोगदा परिसर, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, मोळाचा ओढा, वाढेफाटा तसेच अजिंक्यतारा किल्ला, चारभिंती परिसरात ही कारवाई सुरु होती.

सातारा शहर परिसरातही साध्या वेशातील पोलीस कर्मचारीही गस्त घालत होते. नाकाबंदीवेळी पोलिसांनी वाहन चालवण्याचा परवाना, वाहनांची कागदपत्रे तपासण्याबरोबरच ब्रिथ नलायझर मशिनद्वारे मद्यपी चालकांचा शोध घेतला. यामध्ये रात्री ९ वाजेपर्यंत चार जण मद्यधुंद स्थितीत आढळून आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण तालुक्यातील इंगळे टोळी दोन वर्षासाठी तडीपार
पुढील बातमी
सातारा शहर पोलिसांचे 8 जुगार अड्ड्यांवर छापे

संबंधित बातम्या