सातारा : सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी व सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक प्राप्त जनता सहकारी बँक लि. साताराच्या वतीने बँकेचे सभासद बांधकाम व हॉटेल व्यावसायिक. हणमंत देविदास तुपे यांना 'मारुती सुझुकी एक्सएल ६ झेटा' या चार चाकी गाडीचे वितरण बँकेचे भागधारक पॅनल प्रमुख, जेष्ठ संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी, चेअरमन अमोल मोहिते यांच्या हस्ते, बँकेचे संचालक सदस्य, अधिकारी व सेवकांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आले.
यावेळी बोलताना चेअरमन अमोल मोहिते यांनी जनता सहकारी बँकेच्यावतीने नवीन व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या तरुण व होतकरू व्यावसायिकांसाठी तसेच व्यवसाय सुरु असलेल्या व्यावसायिकांना व्यवसाय वाढ करणेसाठी कॅश क्रेडीट कर्ज तारणी ९.५० टक्के व सामान्य कर्जतारणी १० टक्के या विशेष अल्प व्याजदराच्या कर्ज योजना सुरु आहेत. बँकेमार्फत सुरु असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व योजनांचा लाभ जास्तीत जास्त सभासद व उद्योजकांनी घ्यावा असे आवाहन केले.
हणमंत देविदास तुपे यांनी बँकेकडून वाहन कर्ज त्वरित वितरीत केल्याबद्दल सर्व संचालक सदस्य, अधिकारी व सेवक वर्ग यांना सहकार्याबद्दल धन्यवाद देवून बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमास बँकेचे संचालक वजीर नदाफ, बँकेचे सभासद व माजी नगरसेवक शेखर मोरे पाटील, राजू गोरे, सेवक संचालक नीळकंठ सुर्ले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार, महेंद्र पुराणिक, सौ आशा जगदाळे, सौ.सरीता कुंजीर, बँकेचे अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
