शाहूनगर येथे शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार

by Team Satara Today | published on : 29 October 2026


सातारा : शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्‍यात मुलाच्या खिशात पेटता फटाका टाकल्याने तो जखमी झाला. ही घटना शाहूनगर येथे दि. 26 ऑक्टोबर रोजी घडली आहे. याबाबतचा जाब विचारल्यानंतर तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांनी शिवीगाळ केली. सातारा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पो. हवा. पाटोळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुनवडीत उरमोडी धरणाच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू
पुढील बातमी
सातार्‍यातील करंजे येथे दुचाकी जाळल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा

संबंधित बातम्या