सातारा : विष प्राशन केलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायगुडे मळा तालुका खंडाळा येथील परशुराम शंकर धायगुडे या 58 वर्षीय वृद्धाने तणनाशक विषारी औषध पिल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांचा खंडाळा येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चंद्रकांत पोपट धायगुडे व 38 राहणार पिंपरी बुद्रुक यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार एस.के. काकडे तपास करत आहेत.