सातारा : राज्यातील पहिला मराठी भाषा पंधरवडा मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिकेच्यावतीने सुरु करण्यात आला. यंदा या मराठी भाषा पंधरवड्याचे १४ वे वर्ष असून त्याचा समारोप रविवार दि. १६ मार्च रोजी शाहू कलामंदिर येथे सायंकाळी ६ वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
पत्रकात, कवी कुसुमाग्रज यांची जयंती आणि वि.दा.करंदीकर यांचा स्मृतीदिनाचे औचित्य साधून या कालावधीत विविध कार्यक्रम घेतले जातात. याहीवर्षी श्री. विनोद कुलकर्णी यांनी भाषा पंधरवड्याचे नियोजन केले होते. यंदाचे हे १४ वर्ष होते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विविध कार्यक्रम घेण्यात आले त्याला साहित्यप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षीच्या मराठी भाषा पंधरवड्याचा समारोप रविवार दि.१६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता शाहू कलामंदिर येथे होणार आहे. याप्रसंगी नामवंत निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या पंच्याहत्तरीनिमित्ताने सत्कार व मुलाखत होणार आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची विशेष उपस्थिती असणार आहे. स्नेहल दामले, घन:श्याम पाटील हे मुलाखत घेणार आहेत. यावेळी अभिजित बापट, अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेल्या अभिवाचन आणि काव्य लेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. समारोपाच्या कार्यक्रमास सर्व साहित्यप्रेमी, सातारकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन असे आवाहन, मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष ॲड. चंद्रकांत बेबले, उपाध्यक्ष विक्रम पाटील, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत आणि सदस्यांनी केले आहे.