महामार्गावर बोरगाव गावच्या हद्दीतअपघातप्रकरणी भोरच्या कारचालकावर गुन्हा; अपघातात एकाचा मृत्यू आणि एक जखमी

by Team Satara Today | published on : 05 July 2026


सातारा : अपघातात एकाचा मृत्यू आणि एकास जखमी केल्याप्रकरणी कार चालकाविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 जून रोजी बोरगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत असणाऱ्या सातारा-कराड महामार्गावर चेतन ज्ञानोबा बोडके (रा. भोर, ता. भोर, जि. पुणे) याने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात व बेफिकिरीने चालवून मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली. 

या अपघातात कारमध्ये पुढील सीटवर बसलेले श्रीकांत विठ्ठल भरगुडे (रा. पळशी, ता. खंडाळा) यांचा मृत्यू झाला असून पाठीमागील सीटवर बसलेले अमोल सुरेश खोपडे (रा. कात्रज, पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघात प्रकरणी बोडके यांच्या विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देशातील सर्वात उंच भांबवली वजराई धबधबा ओसंडून वाहू लागला; यंदाच्या पर्यटन हंगामाचा उत्साहात शुभारंभ
पुढील बातमी
गंभीर दुखापत प्रकरणातील तिघांना शिरवळ येथून अटक; शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

संबंधित बातम्या