सातारा जिल्हा मंडप असोसिएशन कार्यकारणी बिनविरोध

by Team Satara Today | published on : 01 August 2025


सातारा : सातारा जिल्हा मंडप, लाईट, फ्लॉवर, डेकोरेशन व्यवसायिक असोसिएशन जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कोरेगाव येथील मंडप व्यवसायिक विजय बर्गे अण्णा यांची अध्यक्षपदी व सातारा येथील रामभाऊ हादगे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच सचिव रमेश साळुंखे, खजिनदार, राजेश भोसले संपर्कप्रमुख, रघुनाथ यादव यांची पुनश्च निवड करण्यात आली. 

सातारा येथील मंडप असोसिएशनच्या सभागृहात या निवडी पार पडल्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सातारा जिल्हा राज्य प्रतिनिधी गोरखनाथ करपे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष यांनी मंडप व्यवसायिकांमध्ये एकजुटीने सातारा जिल्ह्यामध्ये मोठी ताकद निर्माण झाली असून जिल्ह्यातील शेवटच्या मंडप व्यवसायिकापर्यंत पोचून संघटनेमध्ये सहभागी करून संघटनेची ताकद वाढवण्यासाठी मोठ्या ताकतीने प्रयत्न करणार आहोत, असे आश्वासन दिले.

यावेळी जिल्हा राज्य प्रतिनिधी गोरख करपे यांनी महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक फुले वापरण्यावर बंदी आणल्यामुळे मंडप व्यावसायिक अडचणीत आला आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मंडप असोसिएशनच्या वतीने आंदोलन छेडले जाणार असून या आंदोलनात सातारा जिल्हा मंडप व्यवसायिक असोशियन मागे हटणार नाही. यामध्ये सर्व व्यावसायिक सभासद यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनवणे, उपाध्यक्ष अमोल शहा, संदीप गोळे, श्रीकांत हगवणे, दत्तात्रेय कट्टे पाटील, लक्ष्मण थोरात, अमित पवार, हरिदास साळुंखे, हेमंत पवार, जगन्नाथ बडे, अहमद भाई अत्तार, फय्याज मुलाणी, उमेश वाघमारे, चंद्रकांत शेलार, किरण मांगडे, श्यामकुमार काकडे, वाल्मीक नावडकर, फलटणचे नूतन संचालक म्हणून संभाजी लोंढे यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यकारणी चे सर्व संचालक उपस्थित होते. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उरमोडी डावा कालवा प्रकल्पग्रस्तांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
पुढील बातमी
कराड शहरातील 10 बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त करा !

संबंधित बातम्या