जयवंतनगर राजाळे येथे जाधव वस्तीवर घरफोडीमध्ये अडीच लाखांचा ऐवज लंपास

by Team Satara Today | published on : 21 June 2026


फलटण : जयवंतनगर राजाळे, ता. फलटण येथील जाधव वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत सुमारे २ लाख ६६ हजार ३२ रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुष्पा विठ्ठल जाधव यांचे बंद घरात दि. १९ जून रोजी रात्री ९.३० ते २० जून रोजी पहाटे ५.३० या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील कपाटातील रोकड व दागिने चोरून नेले. यामध्ये ७० हजार रुपये रोख रक्कम, ६० हजार रुपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, ४८,१०२ रुपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, २१ हजार रुपये किंमतीची ७ ग्रॅम वजनाची सोन्याची फुलं तसेच ६६, ९३० रुपये किंमतीची टू व्हीलरही चोरट्याने लंपास केली.

याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुष्पा विठ्ठल जाधव यांनी फिर्याद दिली आहे. घरफोडीची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. अधिक तपास फलटण ग्रामीण पोलिस करत आहेत. दरम्यान चोरीच्या घटनेने परिसरात घबराहट निर्माण झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड-ढेबेवाडी रस्त्यावर दुचाकीस्वार-बिबट्यामध्ये धडकेत दुचाकीस्वार जखमी, बेशुद्ध पडलेला बिबट्या नंतर उठून गेला
पुढील बातमी
अपयशाने खचू नका, नव्या दमाने उभे रहा - जिल्हाधिकारी संतोष पाटील, 'कॉफी विथ कलेक्टर' या विशेष उपक्रमांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांशी संवाद

संबंधित बातम्या