सातारा : सातारा शहर परिसरात दोन ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून दारु विक्रीप्रकरणी गुन्हे दाखल केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संगमनगर, सातारा येथे बेकायदा दारु विक्री प्रकरणी कासीम मज्जीद शेख (वय 39, रा. संगमनगर) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 990 रुपये किंमतीच्या 28 देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
राजू मुन्नेर फरास (वय 19, रा. रविवार पेठ, सातारा) याच्याकडून पोलिसांनी 850 रुपये किंमतीच्या 24 दारुच्या बाटल्या जप्त केल्या. ही कारवाई दि. 15 एप्रिल रोजी करण्यात आली आहे.