सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर प्रजासत्ताक दिनादिवशी सकाळी ११ च्या सुमारास दर्शना संतोष मालुसरे (वय ४२ रा. फुरुस,पोस्ट आपटी, ता.. सातारा) यांनी अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात आत्महत्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल ओंकार दीक्षित यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक बोराटे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रजासत्ताक दिनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 27 January 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा