सातारा : सातारा शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 जुलै रोजी लीला हनुमंत माने रा. शाहूनगर, सातारा या राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेल्या आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार पोळ करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, दि. 12 ऑगस्ट रोजी समर्थ मंदिर, राजवाडा येथून सुनील लक्ष्मण रेणुसे रा. मोरेवाडी, पोस्ट बोपोशी, ता. सातारा हे हॉटेल कामावर जातो, असे सांगून निघून गेले आहेत. अधिक तपास सहाय्यक फौजदार जाधव करीत आहेत.