सातारा : शहर परिसरातून चारचाकी गाड्यांच्या बॅटर्या काढून, चोरुन नेऊन विकणार्या दुकलीला सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 9 बॅटर्या व 1 मोटार सायकल असा 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रोहित शिवाजी जाधव वय 24 वर्षे रा. गोसावी वस्ती, सैदापूर, ता. जि. सातारा आणि एक महिला अशा दोनजणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी सातारा शहरातून चोरीस जाणार्या चारचाकी वाहनांच्या बॅटरी चोरट्यांचा शोध घेण्याबाबत डी.बी. पथकास सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सातारा डी.बी. पथक रात्रगस्ती दरम्यान संशयीत व्यक्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते.
दि. 10 रोजी गस्ती दरम्यान एकजण व महिला विना नंबरच्या मोटार सायकल वरुन मधोमध काही तरी वस्तू घेवून जात असताना दिसून आल्याने त्यांना थांबवून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात चारचाकी वाहनाच्या दोन बॅटर्या मिळून आल्या. तसेच त्यांच्या ताब्यातील वाहनाबाबतही मालकी हक्काची कोणतीही कागदपत्रे मिळून न आल्याने त्यांच्याविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासा दरम्यान त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता संबंधित महिला व तरुणाने मागील एक महिन्याच्या कालावधीमध्ये सातारा शहर हद्दीमधून आणखी 7 चारचाकी वाहनाच्या बॅटर्या चोरी केल्याचे कबूली देवून बॅटर्या काढून दिल्या. संबंधित संशयीतांकडून एकूण 9 चारचाकी वाहनाच्या बॅटर्या व गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक दुचाकी असा एकूण 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळून आलेल्या बॅटर्या व दुचाकी बाबत अधिक तपास चालू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.हवा. निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रवीण कडव, पो.ना. पंकज मोहिते, पो. कॉ. तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, वैभव माने यांनी केली आहे.
चारचाकी वाहनांच्या बॅटरी चोरी प्रकरणी दोनजणांना अटक; 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त; सातारा शहर डी.बी. पथकाची कारवाई
by Team Satara Today | published on : 11 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा