पाच हजारांच्या लाचप्रकरणी तत्कालीन दुय्यम निरीक्षकाला ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा; तत्कालीन कॉन्स्टेबलची निर्दोष मुक्तता

by Team Satara Today | published on : 19 November 2025


सातारा : पाच हजारांची लाच घेतल्या प्रकरणी तत्कालीन दुय्यम निरीक्षकाला ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा विशेष न्यायाधीश, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.तांबोळी यांनी सुनावली. सबळ पुराव्याअभावी तत्कालीन कॉन्स्टेबलची निर्दोष मुक्तता केली. 

राज्य उत्पादन शुल्क,कोरेगाव कार्यालयातील आरोपी लोकसेवक तत्कालीन दुय्यम निरीक्षक भिवा लक्ष्मण येळेयांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात जप्त केलेली मोटरसायकल सोडण्यासाठी तक्रार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी करून ती लाच रक्कम भगवान भालगुराम पवार (तत्कालीन कॉन्स्टेबल, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, कोरेगाव) यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यांनी लाच स्वीकारण्याच्या दृष्टीने प्रयत्न केल्याचे लाच लुचपत विभागाने केलेल्या सापळा कारवाईत निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर २० मार्च २०१७ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या खटल्याची सुनावणी, विशेष न्यायाधीश, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.तांबोळी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने गुन्ह्यातील साक्षी पुरावे ग्राह्य धरून आरोपी भिवा येळे यांना दोषी धरून त्यांना भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमन सन 1988 चे कलम ७,१३(१ )(ड)सह १५ अंतर्गत ३ वर्ष सश्रम कारावास व १ लाख १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ७ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे,या गुन्ह्यातील दुसरा आरोपी लोकसेवक भगवान पवार यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली असून ही शिक्षा १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दोषी ठरवून देण्यात आली.

या खटल्याचे कामकाज शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता विशेष न्यायालय एम. एच. ओक यांनी पाहिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिला राखीव जागेवर पुरुषाचा उमेदवारी अर्ज वैध; निवडणुक प्रशासनाकडून झालेली चूक दुरुस्त
पुढील बातमी
खटावच्या शिवारात पाणी आणण्याचे स्वप्न पूर्ण केले; महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा - आ. महेश शिंदे; नेर उपसा सिंचन योजनेचे जलपूजन, भूमिपूजन

संबंधित बातम्या