साताऱ्यातील जपान कराटे असोसिएशनच्या जकातवाडी येथील नवीन शाखेचे उद्घाटन उत्साहात

by Team Satara Today | published on : 04 August 2026


सातारा : जपान कराटे असोसिएशन, सातारा यांच्या जकातवाडी येथील नवीन शाखेचे उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उद्घाटनप्रसंगी सातारा जिल्हा प्रमुख सेन्सेई वीरेंद्र परदेशी, त्यांच्या अर्धांगिनी तेजश्री परदेशी तसेच त्यांचा सुपुत्र अर्णव परदेशी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी नवजवान सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल जगताप, सचिव जनार्दन भोसले, खजिनदार उत्तम सणस, तसेच निलेश भोसले, मनोज शिंदे आणि विकास जगताप यांनी विशेष उपस्थिती दर्शविली.

यावेळी साताऱ्याचे सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर व महाराष्ट्र श्री किताब विजेते नवनाथ साळुंखे यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या उद्घाटन समारंभाला नागरिक, पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे उद्घाटनाच्या दिवशीच १० मुला-मुलींनी कराटे प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला, ही शाखेसाठी आनंदाची बाब ठरली. या नवीन शाखेच्या उद्घाटनाबद्दल रोहित यादव व श्रीकांत सावंत यांनी शुभेच्छा देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी सेन्सेई वीरेंद्र परदेशी यांनी कराटेच्या माध्यमातून शिस्त, आत्मसंरक्षण, आत्मविश्वास आणि उत्तम व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याचा संकल्प व्यक्त केला. जकातवाडी परिसरातील अधिकाधिक विद्यार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
सेवानिवृत्तांनी अनुभवाची शिदोरी समाजाला द्यावी - यशेंद्र क्षीरसागर,श्रीमती स्मिता शिंदे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

संबंधित बातम्या