पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूहून पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती मालमत्ता विरोधी पथकाला मिळाली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या या माहितीच्या आधारे मालमत्ता विरोधी पथकाने तात्काळ पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सापळा रचला. संशयास्पद कंटेनर दिसताच पोलिसांनी त्याला थांबवले आणि चौकशी सुरू केली. सुरुवातीला वाहनचालक आणि तस्करांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कंटेनर उघडून पाहताच मोठ्या प्रमाणावर चंदन लपवून ठेवलेले आढळले.
पोलिसांनी त्वरित कारवाई करत संपूर्ण कंटेनर ताब्यात घेतला आणि त्यातील चंदनाचा साठा जप्त केला. प्राथमिक अंदाजानुसार जप्त केलेल्या चंदनाची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत असू शकते. या चंदनाची तस्करी आंतरराष्ट्रीय बाजारात करण्याचा डाव होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.या प्रकरणात पोलिसांनी वाहनचालकासह संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीतून हे चंदन बंगळुरूहून पुणे मार्गे मुंबईला पाठवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही तस्करी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीसाठी करण्यात येत असल्याचा संशय आहे. या तस्करीमध्ये मोठे माफिया गट सामील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.चंदनाचा वापर केवळ आयुर्वेदातच नाही धार्मिक विधींमध्येही केला जातो. कोणत्याही देवतेची पूजा चंदनाशिवाय पूर्ण होत नाही. पूजेसाठी लाल चंदन, पिवळे चंदन, पांढरे चंदन, हरिचंदन, गोपी चंदन इत्यादी चंदनाचे अनेक प्रकार आहेत. चंदनाच्या झाडांचा सुगंध आश्चर्यकारकपणे आनंददायी असतो, आणि त्यांच्या अद्वितीय गुणांपैकी एक म्हणजे ते हवेत सोडतात तो सुगंध अनेक पिढ्या टिकतो. चंदनाचा वापर पिढ्यानपिढ्या आरोग्यविषयक समस्यांवर उपचार करण्यासाठी घरगुती औषध म्हणून केला जात आहे आणि लाकूड आणि पाने या दोन्हीचे अनेक फायदे आहेत. चंदनाचा वापर आयुर्वेदिक औषध म्हणून केला जात आहे आणि आजही त्याची उत्पादने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.