सुशिक्षित बेरोजगारांनी आपली उमेदवार नाव नोंदणी मधील माहिती अद्यावत करावी

by Team Satara Today | published on : 23 August 2025


सातारा : सातारा जिल्हयातील ज्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी नाव नोंदणी मधील आपली आधारकार्ड संलग्न सर्व  माहिती अद्यावत केली नाही त्यांनी या विभागाचे वेब पोर्टल  https:rojagar.mahaswayam.gov.in ओपन करावे. त्यानंतर त्यानंतर जॉब सीकर, नोकरी साधक, नोकरी शोधा या टॅबवर क्लिक केल्यानंतर उजव्या बाजुला आपणास जॉब सीकर हे  बटन दिसेल. त्यामध्ये आपला नोदंणी क्रमांक,आधार क्रमांक व पासवर्ड वापरुन लॉगिन करावे. त्यानंतर प्रेाफाईल मध्ये एडीट बटण संपादित करा या टॅबवर क्लिीक करुन उर्वरित सर्व माहिती   वैयक्तीक माहिती, शैक्षणीक माहिती, अनुभव तसेच बँक खाते तपशील व इतर अद्यावत माहितीसह जास्तीत जास्त उमेदवारांनी आपली नोंदणी प्रकिया पुर्ण करावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास आधिकारी  सुनिल पवार यांनी केले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी
पुढील बातमी
सातारा जिल्हा बँक राज्यात आघाडीवर

संबंधित बातम्या