सातारा : दुचाकीने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जखमी झाले असून दुचाकीस्वारावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोवई नाका ते भू-विकास बँक रस्त्यावर दुचाकी अपघातात पती-पत्नी जखमी झाले. नंदा मोहन कोदे (वय 67) व मोहन कोदे (दोघे रा. संगमनगर, सातारा) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दुचाकीस्वार सागर सावंत याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 21 जुलै रोजी घडली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार वरे करीत आहेत.