वीजचोरीप्रकरणी साताऱ्यातील एकावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 15 April 2026


सातारा : मल्हारपेठ (सातारा) येथील एकावर वीज चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अमित धनाजी सावंत (रा. मल्हारपेठ, ता. जि. सातारा) असे वीज चोरी गुन्हा जाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे. वीज कपंनी अधिकारी वैभव मदने यांनी याबाबत सातारा शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. सावंत यांनी सन २०१९ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान वीज चोरी केल्याचे निदर्श नास आल्यानंतर महावितरणच्यावतीने ही कारवाई करुन त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला. पो. हवालदार यादव हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नेले येथील मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल; शेतजमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरुन वाद
पुढील बातमी
तडीपार आदेश भंग केल्याप्रकरणी शाहूपूरी येथील एकावर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या