कराड तालुका पंचायत समिती कार्यालयाच्या इमारती उभारणीसाठी 15 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

by Team Satara Today | published on : 13 May 2026


कराड : कराड तालुका पंचायत समितीच्या कार्यालयाच्या नव्या सुसज्ज प्रशासकीय इमारतीसाठी तांत्रिक मंजुरी मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागातून देण्यात आली. आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारने कराड पंचायत समितीच्या स्वतंत्र आणि सुसज्ज प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी तब्बल 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ग्रामीण विकास विभागाच्या आदेशानुसार हा निधी मंजूर करण्यात आला असून, 3620 चौ. मी. क्षेत्रफळाच्या जागेत या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे या इमारतीच्या उभारणीसाठी 15 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. नुकतीच तांत्रिक मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया राबवून बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागातून देण्यात आली.

कराड पंचायत समितीची सध्याची इमारत ही जुनी व जीर्ण झाली आहे. यामुळे कामकाजासाठी जागा अपुरी पडत आहे. याच इमारतीमध्ये बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे, बाल विकास प्रकल्प आदी विभागांची कार्यालये कार्यरत आहेत. कराड तालुका हा लोकसंख्येच्या आणि कामकाजाच्या दृष्टीने मोठा तालुका असून, शासकीय कामांसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकं येतात. पण अपुऱ्या जागेमुळे लोकांची गैरसोय होते. पंचायत समितीशी निगडित सर्व कार्यालये एकाच ठिकाणी यावीत आणि त्या माध्यमातून नागरिकांना सर्व शासकीय सेवांचा लाभ घेता यावा, यासाठी आ.डॉ.भोसले यांनी विशेष प्रयत्न केले होते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यपालांच्या हस्ते तापती भौमिक मजूमदार यांच्या चित्र प्रदर्शनाचे मुंबईत उद्घाटन
पुढील बातमी
रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांचा दणका; सातारा शहर परिसरातील 10 जणांची टोळी तडीपार

संबंधित बातम्या