साताऱ्यात दुचाकीस्वारांकडून चेन स्नॅचिंग; महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण

by Team Satara Today | published on : 08 April 2026


सातारा : शहरात महाजन हॉस्पिटल ते गजवदन गार्डन या रस्त्यावर दि ७ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली असून, दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी सेवानिवृत्त महिलेला लक्ष्य केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,रागिणी सतीश देशपांडे (वय ६०, रा. मोनार्क हॉटेल जवळ, सातारा) या रस्त्यावरून जात असताना भक्तीधाम बंगल्यासमोर विरुद्ध दिशेने मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी अचानक त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. हे मंगळसूत्र सुमारे दोन तोळे वजनाचे असून त्यामध्ये काळे मणी व सोन्याचे दोन वाट्या होत्या. त्याची अंदाजे किंमत सुमारे ७४ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. 

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून वेगाने पसार झाले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत असल्याची चर्चा आहे.

या प्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात मुलींचे वसतीगृह चालकास शिवीगाळ व मारण्याची धमकी; प्रवेशावरून वाद
पुढील बातमी
साताऱ्यात बसाप्पापेठ परिसरात दारू पिण्यासाठी कन्ट्रक्शन व्यवसायिकाला मारहाण करत जबरी चोरी

संबंधित बातम्या