पाच जणांना मारहाण केल्याप्रकरणी सुमारे 20 जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 02 December 2024


सातारा : पाच जणांना मारहाण केल्याप्रकरणी सुमारे 20 जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिनी साउंडच्या स्पर्धेवेळी झालेल्या वादाच्या कारणावरून अरबाज अमीर शेख, अमीर शेख, असलम शेख, एहमद शेख आणि आशिष जाधव यांना लाथाबुक्क्यांनी, दांडक्याने, लोखंडी फायटरने मारहाण केल्याप्रकरणी हर्ष रोहिदास नलवडे, अमित आप्पा तांदळे, संकेत गणेश कापसे, आकाश दत्तात्रय माने, नोहेल तांदळे, संकेत अलगुडे आणि इतर 15 ते 16 जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील हर्ष रोहिदास नलवडे, अमित आप्पा तांदळे, संकेत गणेश कापसे यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 5 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऊस दराबाबत तोंड उघडा अन्यथा परिणामास तयार रहा
पुढील बातमी
देशमुख कॉलनीत सुमारे अडीच लाखांची घरफोडी

संबंधित बातम्या