ट्रॅक्टरखाली सापडून शाळकरी मुलाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 01 January 2025


सातारा : शिरवडे, ता. कराड येथे ट्रॅक्टरखाली सापडून एका 14 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू  झाला.

शेखर दत्तात्रय जगदाळे (वय 14) असे मृत मुलाचे नाव असून याप्रकरणी परवाना नसताना ट्रॅक्टर चालवून हलगर्जी मृत्युप्रकरणी दुसर्‍या एका 16 वर्षीय अल्पवयीन बालकाविरोधात मसूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 29 रोजी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सहायक फौजदार दिनकर काळे यांनी फिर्याद दिली. शेखरला ट्रॅक्टरच्या पायरीवर बसवून भरधाव वेगाने जात असताना खाली पडल्याने शेखरच्या अंगावरून ट्रॅक्टरचे डाव्या बाजूचे मागील चाक गेले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कागदपत्रे गहाळ करणार्‍या निवृत्त पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा
पुढील बातमी
आरोग्यमित्रांना किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळाला पाहिजे : डॉ.डी.एल.कराड

संबंधित बातम्या