वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता

by Team Satara Today | published on : 11 December 2024


सातारा : सातारा शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी क्षेत्र माहुली, ता. सातारा येथील राहत्या घरातून योगेश मोहन जाधव हे कोणास काही एक न सांगता निघून गेले आहेत. अधिक तपास महिला पोलीस नाईक कदम करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत, गोडोली सातारा येथून एक 19 वर्षीय युवती राहत्या घरातून नक्षत्र महोत्सव पाहण्यासाठी जाते, असे सांगून निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न

संबंधित बातम्या